होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे प्रशासन, महानगरपालिका ब्रिज पडण्याची वाट पाहतय का?

रेल्वे प्रशासन, महानगरपालिका ब्रिज पडण्याची वाट पाहतय का?

Published On: Jul 04 2018 12:00PM | Last Updated: Jul 04 2018 11:59AMठाणे : प्रतिनिधी

कार्पोरेट क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे लोअर परेल "पूर्व स्टेशनजवळ पद्यचारी पूल खूप दिवस झाले काही कामासाठी खोदून ते तसेच दूरावस्‍थेत आहे". या पुलामुळे येथून ये जा करणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या प्रकारचे अनेक धोक्‍याचे ब्रिज आता मुंबईत अस्‍तित्‍वात आहेत. यापैकीच एक "एलफिन्सटन ब्रिज" या ब्रिजवर र्दुघटना झाली आणि त्या दुर्घटनेत काही निरागस लोकांना आपला जीव गमवावा लागला. याचप्रकारचा अपघात ३ जुलै रोजी "अंधेरी ब्रिज" कोसळला, त्या प्रकारचा अपघात "लोअर परेल ब्रिज" वर झाल्या नंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा सवाल मुंबईकरांमधून उपस्‍थित होत आहे.

हा ब्रिज पडल्यानंतरच कामाला सुरूवात करणार का असा जाब नागरिक विचारत आहेत.