Thu, Apr 25, 2019 23:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्तव्याची जाणीव म्हणजे काय? न्यायाधीश काथावला याचे उत्तम उदाहरण

कर्तव्याची जाणीव म्हणजे काय? न्यायाधीश काथावला याचे उत्तम उदाहरण

Published On: May 06 2018 11:08AM | Last Updated: May 06 2018 11:07AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

गेल्या काही दिवसात देशाच्या न्यायपालिकांमधील बरेच वादाचे मुद्दे समोर आले आहेत. न्यायपालिका पक्षपाती आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून ढवळून निघत असतना याच न्यायव्यवस्थेतून एक आश्चर्याची आणि एक शिकवण देणारी बातमी आली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शाहरुख काथावाला यांनी उन्हाळी सुट्टीवर जण्याआधी आपल्याकडील महत्वाच्या सर्व केसेसचा निपटारा रात्री साडेतीन वाजेपर्यंत करुन ‘कर्तव्याची जाणीव असणे’ म्हणजे काय असेत याचे उदाहणच घालून दिले. 

मराठीत एक प्रसिध्द म्हण आहे ‘शाहण्याने कोर्टाची पायरी कधी चढू नये.’ ज्यांना ज्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली त्यांना या म्हणीची प्रचिती येतेच. पुरेशा मुनष्यबळाअभावी न्यायव्यवस्थेवर प्रचड ताण येत असल्याने देशातील सर्वच न्यायालयात दावे प्रलंबित राहणे हे नित्याचेच झाले आहे. पण, आपल्याकडे आलेल्या केसेसचा निपटारा आपण वेळेत करुन पक्षकारांना दिलासा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश शाहरूख काथावाला यांनी मध्यरात्रीपर्यंत काम करुन एक आदर्शच घालून दिला. त्यांनी आपल्याकडील महत्वाच्या खटल्यांचा निपटारा करण्याचा धडाकाच लावला. ज्यां केसमध्ये अंतरिम आदेश देणे गरजेचे आहे त्या केसेस ऐकून त्यावर निकाल दिला. जवळपास १०० दिवाणी खटल्यांवर मध्यरात्री ३.३० पर्यंत सुनावणी करत त्यांनी पेंडिंग केसचा ढिगारा कमी केला.

कार्यालयातील कर्मचारी आणि काही वरिष्ठ वकिलांनी न्यायाधीश काथावालांची जास्त वेळ थांबून काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नसल्याचे सांगितले. सहसा न्यायाधीश काथावाला सकाळी १० वाजताच कामाला सुरवात करतात तसेच गरज पडल्यास ते संध्याकाळी ५ नंतरही कोर्ट सुरु ठेवतात. जरी रात्री उशिरापर्यंत काम केले तरी काथावाला सकाळी ठरलेल्या वेळेतच कोर्टात हजर असतात असे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. न्यायाधीश  काथावालांनी कामाच्या त्यांच्या या शैलीमुळे ‘झिरो पेंडन्सी’ त्तव पाळण्यासाठी काय करावे लागते याचा आदर्शच घालून दिला आहे.  
 

Tags : bomby high court,mumbai high court,  judge Shahrukh J Kathawalla,clear backlog, zero pendency, pendency of cases, late night court,