Tue, Nov 13, 2018 23:49



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘निलंगेकरांनी केली ७६ कोटींच्या थकबाकीची २५ कोटीत सेटलमेंन्ट’

‘निलंगेकरांनी २५ कोटीत सेटलमेंन्ट केली’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





मुंबई  : प्रतिनिधी

भाजपाचे कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्हिक्टोरिया अॅग्रो प्रोसेसिंग नावाने मद्यार्क बनवण्याची कंपनी २००८ मध्ये स्थापन केली. स्वतः संभाजी पाटील व त्यांचे बंधू अरविंद आणि बहीण प्राजक्ता हे कंपनीचे संस्थापक मालक असून १ मे २००८ ते ९ सप्टेंबर २००८ पर्यंत संचालक म्हणून काम करत होते. २००९ रोजी जरी त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असला तरी ते सभासद म्हणून कंपनीचे भागीदार आहेत, तसेच कर्जासाठी ते स्वतः जामीनदार आहेत. महाराष्ट्र बँक व युनियन बँकचे मिळून ३९.९९ कोटी एवढे कर्ज त्‍यांनी घेतले आहे. आता ती रक्कम मूळ मुद्दल व व्याजासहित जवळपास ७६ कोटी एवढी झाली असताना, आता ते फक्त २५ कोटीत सेटल करण्यात आलयं विशेष म्हणजे २०१५ मध्ये संभाजी पाटील निलंगेकर ४१ कोटी भरायला तयार होते. असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्‍या प्रीति शर्मा मेनन यांनी केला आहे.

२०११ मध्ये कर्ज खाते हे थकबाकीत गेल्यानंतर बँकेने जेव्हा कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केला तेव्हा बँकेच्या लक्षात आले की कर्ज मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे जमा केली आहेत. या कर्जासाठी गहाण ठेवलेली जमीन ही संभाजी पाटील यांच्या नावावर नसून ती त्यांच्या आजोबाच्या नावावर आहे. व तसेच मालमत्तेचे मूल्यांकन अनाधिकृत व्हॅल्यूवर कडून करून घेउन मालमत्तेच्या किमतीपेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज मंजूर करून घेउन फसवणुक केली आहे. त्‍यामुळे संभाजी पाटील यांच्याविरोधात सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

सीबीआयच्या तपासानुसार या कंपनीने कोणताही उद्योग सुरू केलेला नसून फक्त बँकेची फसवणूक करण्यासाठी कंपनी स्थापन केल्याचे दिसून येते. हे सगळे माहित असताना निलंगेकर हे त्या कर्जासाठी फक्त जमानतदार आहेत त्यांचा त्या कर्जाशी काही संबंध नाही असे सांगून  त्‍यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आहे असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना कॅबिनेट दर्जाचे कामगार मंत्रिपद बहाल केले. तसेच लातूरचे पालकमंत्रिपद दिले. आता वरून ७६ कोटी एवढं कर्ज फक्त २५ कोटीत सेटल करण्यात आलयं. एकीकडे गोरगरीब जनता भुकेने मरत आहे. महाराष्ट्र सरकार कर्जाने डबघाईला आलं आहे. शेतकऱ्याला दिलेली कर्जमाफी ही फक्त कागदावरच आहे. शेतकरी रोज आत्महत्या करत असे आसताना ७६ कोटीची थकबाकी २५ कोटीत सेटल करण्यात आल्‍याने हे कितपत योग्‍य आहे असा प्रश्न आम आदमीकडून उपस्‍थित करण्यात आला आहे. 

सीबीआयच्या कारवाईतून वाचण्यासाठीच ही सेटलमेंट करण्यात आली आहे. भाजपा सरकारचे मंत्री रोज नवीन नवीन घोटाळे करत असून. दंगली व मोर्चे घडवून आणून जनतेची दिशाभूल केली जात आहे. असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.

बँका या गोरगरीब शेतकरी व सामान्य वर्गाकडून त्यांच्या कर्जाचा पै ना पै वसूल करतात. दुसरीकडे मंत्री मात्र असा करोडोंचा घोटाळा करतात वरून त्यांना कर्जमाफी मिळते. त्‍यामुळे सामान्य माणसाचा बँकेवरचा विश्वास उडत चालला आहे. त्‍यामुळे आम आदमी पार्टी या घटनेचा निषेध करत असून संभाजी पाटील निलंगेकर यांचा कामगार मंत्री पद व पालकमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा. तसेच या घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या इतर सर्व आरोपींना अटक करून त्यांच्या कर्जाची सगळी रक्कम व्याजासहित वसुली करण्यात यावी. अशी मागणी आम आदमी पक्षाच्या प्रीति शर्मा मेनन यांनी केली आहे.






  •