होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : ऐरोली सेक्टर ३ येथील भुयारी मार्ग वाहतूकीसाठी बंद

मुंबई : ऐरोली सेक्टर ३ येथील भुयारी मार्ग वाहतूकीसाठी बंद

Published On: Jan 30 2018 1:25PM | Last Updated: Jan 30 2018 1:24PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

ऐरोली सेक्टर ३ येथील भुयारी मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. 

ऐरोली सेक्टर ३ येथील भुयारी मार्ग सेफ्टी रॉड तुटला असुन सदर मार्ग बंद करण्यात आला आहे. तरी नागरीकांनी सेक्टर ५ येथील मार्गाचा वापर करावा असे आवाहन  वहातूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोजा यांनी केले आहे. 

ममता डिसोजा म्हणाल्या ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून भुयारी मार्गाचा सेफ्टी रॉड तुटल्यावर या मार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे.’