Fri, Nov 24, 2017 20:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्ती : समितीत व्यापक चर्चा

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्ती : समितीत व्यापक चर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : चंद्रशेखर माताडे

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासह अंबाबाई मंदिर कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मसुदा समितीच्या व्यापक बैठकीला सुरुवात झाली. या आठवड्यातच कायद्याचे प्रारूप तयार करून ते छाननीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. या छाननीनंतर ते येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

पंढरपूर, शिर्डी व सिद्धिविनायक मंदिराच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरातही पगारी पुजारी नेमण्याची तरतूद करावी, अशी मागणी कोल्हापुरात करण्यात आली होती. जिल्हाधिकार्‍यांनी कृती समिती व पुजारी प्रतिनिधींशी चर्चा करून त्याचा अहवाल सरकारला सादर केला होता. अंबाबाई मंदिर   कायदा मसुदा समिती त्याचाही आधार घेणार आहे.

पगारी पुजारी नेमण्यासाठी पूर्वीचे निर्णय, करवीर छत्रपतींचे आदेश, सनदा यासह अन्य कागदपत्रांचा आधार घेतला आहे. पंढरपूर आदी देवस्थानांमध्ये नेमलेल्या पगारी पुजार्‍यांच्या नियुक्तीचे कायदेही आहेत. अंबाबाई मंदिरात पगारी पुजार्‍यांची नेमणूक करण्यासाठी करावी लागणारी तरतूद ही कायद्याच्या कसोटीवर टिकली पाहिजे, यासाठी विचार केला जात आहे.