Tue, Sep 25, 2018 05:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बदलापूर : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बदलापूर : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बदलापूर : प्रतिनिधी

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे त्याचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान बेलवली फाटकाजवळ उन्हामुळे रूळ प्रसरण पावल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दुपारी पावणे तीनच्या दरम्यान  विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक गाड्या गेल्या अर्ध्या तासाहून अधिक काळ खोळंबल्या आहेत. 

मध्य रेल्वेच्या मार्गावर बदलापूरकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक खोळंबल्याने बदलापूर कर्जत खोपोलीकडे जाणाऱ्या गाड्या संध्याकाळी उशिरा धावणार आहेत. ठाणे जिल्ह्यात येत्या 48 तासात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे दुपारी रस्त्यावरची वर्दळ कमी झाली आहे.  रेल्वे वाहतुकीवरही या वाढलेल्या तापमानाचा फटका बसल्याने आणि उकाड्यामुळे प्रवासी अधिच हैराण झाले आहेत त्यातच हा फटका बसल्याने प्रवाशांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पुढील अर्ध्या तासानंतर ही वाहतूक सुरळीत होईल असे बदलापूर रेल्वे स्टेशन मास्तर कार्यालयातून सांगण्यात आले. 

Tags : central railway, transport, mumbai,  ambarnath,  badlapur


  •