Wed, Jan 23, 2019 10:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उध्दव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे यासाठी शोले स्‍टाईल आंदोलन(Video)

उध्दव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे यासाठी शोले स्‍टाईल आंदोलन(Video)

Published On: May 27 2018 5:06PM | Last Updated: May 27 2018 5:17PMमुंबई प्रतिनिधी

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र यावे या मागणीसाठी एका शिवसैनिकाने आज अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. या शिवसैनिकाने मुंबईतील एका उंच मनोर्‍यावर वर चढून शोले स्‍टाईल आपली भावना व्यक्‍त केली.

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र यावे असे महाराष्‍ट्रातील तमाम जनतेला वाटते. अशीच तीव्र इच्छा असलेला शाम गायकवाड हा कार्यकर्ता या मागणीसाठी मुंबईतील दादर टिटी खोदादाद सर्कल येथील जगन्नाथ शंकरशेट् पुलावरील मनोऱ्यावर चढला. यावेळी नागरीकांनी त्‍याला पाहण्यासाठी रस्‍त्‍यावर गर्दी केली होती.

हा कार्यकर्ता यवतमाळ जिल्‍ह्‍यातील ईसापूर येथील रहिवाशी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्‍निशमन दल घटनास्‍थळी दाखल झाले असून, या कार्यकर्त्याला मनोर्‍यावरून उतरविण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.