Fri, Apr 26, 2019 15:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरी, गोरेगाव,पार्ल्यामध्ये वाहतूक कोंडी

अंधेरी, गोरेगाव,पार्ल्यामध्ये वाहतूक कोंडी

Published On: Jul 04 2018 4:03PM | Last Updated: Jul 04 2018 4:03PMमुंबई  : प्रतिनिधी 

दुर्घटनाग्रस्त गोखले पूल वाहतूकीसाठी बंद केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना पर्यायी रस्त्यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे गोरेगाव, अंधेरी आणि विले पार्ले तसेच  वेस्टर्न हायवेला जोडलेल्या सर्वच मार्गांवर वाहतुकीची प्रचंड  कोंडी झाली.  वाहतुक पोलीस ही  कोंडी हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मंगळवारी सकाळी अंधेरी-विलेपार्ले येथील पूल अचानक कोसळल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. आजदेखील पश्चिम रेल्वेच्या धीम्या गतीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या दुरुस्तीसाठी हा पादचारी पूल बंद ठेवण्यात आला आहे. मात्र यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तसेच अंधेरी आणि विलेपार्ले येथे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच अंधेरीतील पंप हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जुना नागरदास, नवीन नागरदास रोड, आंबोली फाटक, एसव्ही रोड, लिंक रोड, विलेपार्ले, बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल या रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे १५ मिनीटांच्या मार्गासाठी दीड ते दोन तास लागत होते. गोखले पूल बंद केल्यामुळे पश्चिम भागातील सर्वच वाहतूक मार्गांवर गाड्यांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पोलिसांना प्रवाशांची मदत

मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडी काही नवीन नाही. थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला तरी रस्त्यांवर गाड्यांची रांग लागते. सकाळी चाकरमानी लोकल, बस, खासगी गाड्यांतून प्रवास करत ऑफिसच्या दिशेने जातात. त्यामुळे एरव्हीदेखील ९ ते १२ या वेळेत हायवेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अशातच एका पूलाचा पर्याय बंद झाल्याने इतर मार्गांवर त्या गाड्या वळवल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त गर्दी या पर्यायी रस्त्यांवरही पाहायला मिळाली. वाहतूक पोलिसांसोबतच प्रवासी, मुंबईकरांनी गाडीतून उतरून वाहतूकीला वाट करून दिली. सकाळी जरी हायवेवर गाड्यांची रिघ लागलेली दिसत असली तरी संध्याकाळी परतीच्या मार्गावरही हेच चित्र पाहायला मिळणार यात शंका नाही.