Wed, Jan 16, 2019 15:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे टीसींच्या हाती दिसणार टॅब!

रेल्वे टीसींच्या हाती दिसणार टॅब!

Published On: Dec 23 2017 2:32AM | Last Updated: Dec 23 2017 1:49AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

रेल्वेच्या तिकिटांसाठी उडणारी झुंबड आणि हातात पडणारे पार 100 ते 300 पर्यंतचे वेटिंग लिस्टचे तिकीट पाहून प्रवाशांना धडकीच भरते. परंतु आता रेल्वेने कात टाकण्याचा निर्णय घेतला असून रेल्वे प्रवासात डिजिटल क्रांतीच घडणार आहे. रेल्वेच्या टीसींना आता मोबाईल टॅब देण्यात येणार असून त्यासाठी खास मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेचे टीसी एकप्रकारे टॅबमॅन बनणार असून रेल्वेच्या रिकाम्या जाणार्‍या सीट्सची माहिती वेळीच कळून वेटिंग लिस्टमधील प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होण्यास मदत होणार आहे.

मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेमार्गांवर वेगवेगळ्या स्थानकांसाठी तिकीट आरक्षणाचा कोटा दिला जातो. सुट्ट्यांच्या कालावधीत लांब पल्ल्यांचा गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. अशावेळी आसनांची स्थिती समजण्याची टीसींना देण्यात येणारे नवीन टॅब उपयुक्त होणार आहे. या टॅबच्या वापरासाठी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात प्रशिक्षण सुरू आहे. 

स्थानकांवर थांबलेली मेल आणि एक्स्प्रेस, त्यातील डब्यांबाहेरील आरक्षणाची यादी, तिथे प्रवाशांची गर्दी हे दृश्य कायम नजरेला पडते. पावसाळ्यात आरक्षण तक्ता कागद भिजल्यास प्रवाशांची धावपळ होते. त्यातून टीसींवर कमालीचा ताण येतो. आता हा ताण संपण्यास मदत होणार आहे.