Sun, Nov 18, 2018 13:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महालक्ष्मी मंदिरातून निर्माल्य नेण्यास पालिकेचा नकार 

महालक्ष्मी मंदिरातून निर्माल्य नेण्यास पालिकेचा नकार 

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 1:10AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईची धनदेवता म्हणून ओळखल्या जाणार्‍या महालक्ष्मी मंदिरामध्ये मार्गशीर्ष महिन्यानिमित्त गोळा होणार्‍या कचर्‍याबाबत नोटीस बजावत मंदिरातून निर्माल्य घेऊन जाण्यास पालिकेने नकार दिला असल्याचे व्यवस्थापनाला सांगितले आहे. 

शहरातील बहुतेक भाविक हे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करतात. ते पूर्ण झाल्यावर आपल्या घरात जमा झालेले निर्माल्य महालक्ष्मी मंदिराच्या आवारात विसर्जनासाठी आणून ठेवतात. ते निर्माल्य मंदिर व्यवस्थापनाला महापालिकेकडे सुपूर्द करावे लागते. मात्र, यंदा महापालिकेने सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करण्याच्या दृष्टीने सर्व सोसायट्यांना- रहिवाशांना तो वेगळा करण्यासाठी डबे पुरवण्याचे ठरवले आहे. त्या हेतूने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने महालक्ष्मी मंदिर व्यवस्थापनाला नोटीस देऊन ते निर्माल्य मंदिरातून नेण्यास नकार दिला आहे, अशी माहिती श्री महालक्ष्मी मंदिर विश्‍वस्त निधी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. सर्व भाविकांनी हे निर्माल्य गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी येथे पालिकेने व्यवस्था केलेल्या निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.