Sat, Jul 20, 2019 21:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रखडलेली भरती लवकरच

रखडलेली भरती लवकरच

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेच्या एप्रिल 2018 पासून रखडलेल्या चतुर्थ श्रेणीतील 1 हजार 388 कामगारांची भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारने या परीक्षेच्या निकालाला हिरवा कंदील दाखवल्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे येत्या 15 सप्टेंबरपर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

दरम्यान भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी विधान परिषदेत आवाज उठवून या परीक्षेत विचारण्यात आलेल्या अवघड प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यामुळे ही भरतीच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे या भरती प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. याबाबत राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वी महापालिकेला पत्र पाठवून प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली. भरती प्रक्रिया राबवणार्‍या महाऑनलाईन संस्थेला काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.