Thu, Apr 25, 2019 23:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हादसोंका शहर!

हादसोंका शहर!

Published On: Dec 30 2017 1:46AM | Last Updated: Dec 30 2017 1:08AM

बुकमार्क करा
मुंबई : वृत्तसंस्था

2017 या वर्षात देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अनेक भयावह घटनांनी सुन्‍न झाली. ‘हादसों का शहर’ हे मुंबईला दिलेले विशेषण दुर्दैवाने खरे ठरले, असेच म्हणावे लागले. यावर्षी मुंबईत पाच मोठे अपघात झाले आणि त्यात 130 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

26 जुलै : घाटकोपर या उपनगरातील एक जुनी चार मजली इमारत कोसळून 17 लोकांचा मृत्यू झाला.

31 ऑगस्ट : भेंडी बाजारमध्ये एक पाच मजली इमारत कोसळली. यात 33 लोकांचा मृत्यू झाला, तर 20हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

29 सप्टेंबर, 2017 : एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील फूट ओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 लोकांचा मृत्यू, तर शेकडो लोक जखमी झाले होते.

18 डिसेंबर, 2017 :  अंधेरी इस्ट भागात एका फरसाणाच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगारांचा मृत्यू झाला होता.

29 डिसेंबर : कमला मिल कंपांऊडमधील पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू.