Thu, Jan 17, 2019 04:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यपालांचा पुण्यातील स्वातंत्र्य दिनाचा चहापान कार्यक्रम रद्द

राज्यपालांचा पुण्यातील स्वातंत्र्य दिनाचा चहापान कार्यक्रम रद्द

Published On: Aug 04 2018 6:23PM | Last Updated: Aug 04 2018 6:23PMमुंबई : 

दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला राजभवन, पुणे येथे आयोजित केला जाणारा राज्यपालांचा चहापानाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. पोलादपूर येथील आंबेनळी घाटात झालेल्‍या बस दुर्घटनेत अनेक कर्मचारी मृत्‍यूमुखी पडले होते. त्‍या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अलिकडेच पोलादपूर जवळील आंबेनळी घाट येथे झालेल्या बस दुर्घटनेत डॉ. बाळासाहेब सावंत  कोकण कृषी विद्यापीठाच्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा  मृत्यू झाला. या दुःखद पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी पुणे येथील राजभवनात दिनांक १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केलेला चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजभवनातून आज जाहीर करण्यात आले.  

मात्र दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कौन्सिल हॉल पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते होणारा झेंडावंदनाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.