Sun, Aug 25, 2019 02:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Published On: Mar 20 2019 11:30PM | Last Updated: Mar 21 2019 10:52AM
मुंबई : प्रतिनिधी  

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काही तासातच त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत भाऊ  डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. धवलसिंह आणि रणजितसिंह यांच्यातून विस्तवही जात नाही. धवलसिंह यांनी पवार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात आणखी एका काका पुतण्याचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

धवलसिंह मोहिते हे शिवसेनेचे सहसंपर्क नेते असून राज्याचे माजी सहकार मंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते यांचे ते पुत्र आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांना माढ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि धवलसिंह यांच्यात संध्याकाळी उशिरा सुमारे तासभर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या बैठकीला अजित पवार आणि जयंत पाटील हेही उपस्थित होते.