Wed, Jul 24, 2019 12:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : लष्कराने बांधलेल्या पादचारी पुलांचे उद्घाटन 

मुंबई : लष्कराने बांधलेल्या पादचारी पुलांचे उद्घाटन 

Published On: Feb 27 2018 4:55PM | Last Updated: Feb 27 2018 4:55PMमुंबई : प्रतिनिधी

एलफिन्स्टन-परळ, करीरोड आणि आंबिवली या ठिकाणी लष्कराने बांधलेल्या तिन्ही पादचारी पुलांचे उद्घाटन आज (मंगळवार) करण्यात आले. 

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. एलफिन्स्टन स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 23 प्रवाशांचा नाहक बळी गेला होता. 

यानंतर रेल्वे प्रशासनाने एलफिन्स्टन, करी रोड आणि आंबिवलीतील पादचारी पूल उभारणीसाठी थेट लष्कराची मदत घेतली.