Sun, Feb 24, 2019 04:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सातशे स्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी?

सातशे स्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी?

Published On: Mar 14 2018 4:39PM | Last Updated: Mar 14 2018 4:43PMमुंबई : पुढारी आनलाईन 

मुंबईतील ७०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे पालिकेला ६०० कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागणार.

मालमत्ता कर माफीच्या श्रेयासाठी शिवसेना भाजप यांच्यात सुरू असलेल्या लढाईत ए दर्जाच्या मुंबई महापालिकेची आर्थिक बाजू कोलमडून जाणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतची १७ लाख ५७ हजार ८१८ घरे आहेत. यातून महानगरपलिकेला वार्षिक  ३५० कोटींचा महसूल मिळतो. तर ५०१ ते ७०० फुटापर्यंतची दोन लाख ७५ हजार घरे आहेत आणि त्यातून वार्षिक २५० कोटी रूपये महसूल मिळतो.