Tue, Nov 20, 2018 23:04



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत नऊ वर्षात तब्बल 10657 आत्महत्या ! 

मुंबईत नऊ वर्षात तब्बल 10657 आत्महत्या ! 

Published On: Aug 01 2018 5:18PM | Last Updated: Aug 01 2018 5:18PM



मुंबई  : प्रतिनिधी 

मुंबईत 2008 पासून 2016 पर्यंत तब्बल 10657 मुंबईकरांनी आत्महत्या केल्‍या आहेत. तसेच मुंबईत आत्महत्येचा दर वाढला आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना बृहन्मुंबई पोलीस विभागांने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई वाहतूक पोलिस विभागाकडे जानेवरी 2008 पासून मुंबईत झालेल्या आत्महत्यांची संख्येची विचारना केली होती. यामध्ये महिला  तसेच अल्पवयीन मुलांच्या आत्‍महत्‍येचीही संख्येची विचारणा करण्यात आली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक)  जनार्दन थोरात यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे. यात मुंबईत 2008 पासून मे 2016  पर्यंत एकूण 10657 आत्महत्या मुंबईकरांनी केल्‍या आहेत. त्यात 6507 पुरुष आणि 4150 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2008 मध्ये एकूण 1111 मुंबईकरांनी आत्महत्या केल्‍या आहेत. त्यात 667 पुरुष आणि 444 स्त्रियांचे समावेश आहे. 2009 मध्ये एकूण 1051 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 621 पुरुष आणि 430 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2010 मध्ये एकूण 1192 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 701 पुरुष आणि 491 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2011 मध्ये एकूण 1162 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 640 पुरुष आणि 522 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2012 मध्ये एकूण 1196 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 762 पुरुष आणि 534 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2013 मध्ये एकूण 1322 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 831 पुरुष आणि 491 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2014 मध्ये एकूण 1196 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 747 पुरुष आणि 449 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2015 मध्ये एकूण 1122 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 729 पुरुष आणि 393 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2016 मध्ये एकूण 1205 आत्महत्या मुंबईकरांनी केल्‍या आहेत. त्यामध्ये 809 पुरुष आणि 396 स्त्रियांचे समावेश आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबईत लोक आर्थिक तनावामुळे जास्त आत्महत्या करतात. अशा तणावपूर्ण लोकांना काउन्सिलिंग करण्याची तरतूद शासनाने केली पाहिजे