Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बरवर चार दिवस मेगाब्लॉक

हार्बरवर चार दिवस मेगाब्लॉक

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 1:16AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

रायगड आणि मुंबई यांना जोडणार्‍या रेल्वे मार्गाचे नियोजन 30 वर्षापूर्वी झाले होते. या योजनेला सीवूड-उरण रेल्वे मार्ग नाव देण्यात आले. आता 30 वर्षानंतर या योजनेचा विस्तार करण्यास मुहूर्त मिळाला असून सीवूड-उरण मार्ग तयार करण्यासाठी मध्य रेल्वेने नाताळच्या काळात चार दिवसांचा मोठा ब्लॉक घेण्याचे निश्‍चित केले आहे. या मेगा ब्लॉकमुळे या मार्गावरुन प्रवास करणार्‍या 10 लाखाहून अधिक प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चार दिवसांच्या ब्लॉक़ काळात रेल्वेच्या एकूण 240 सेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणार्‍या हार्बरवासीयांना मनस्तापही सहन करावा लागू शकतो.

नेरुळ ते खारघर हा पहिला आठ किलोमीटरचा टप्पा मार्च 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेने ठेवले आहे. तर उर्वरित दुसरा टप्पा डिसेंबर 2019 पर्यंत खुला करण्याचा प्रयत्न आहे. नवीन मार्गामुळे नवी मुंबई उरणशी (रायगड) जोडली जाणार आहे. या मार्गातील कामे पूर्ण करण्यासाठी सध्या मध्य रेल्वेकडून रात्री गाड्या बंद होताच छोटी कामे केली जातात. रेल्वे रुळांसह काही मोठी तांत्रिक कामे बाकी असून त्यासाठी जादा वेळेची गरज आहे. यासाठी 22 डिसेंबर ते 25 डिसेंबपर्यंत नेरुळ ते बेलापूर दरम्यान ब्लॉक घेऊन महत्त्वाची काम करण्याचे नियोजन आहे. 22 डिसेंबरपासून रात्री 8 वाजल्यापासून या ब्लॉकला सुरुवात होणार असून 25 डिसेंबर रोजी दुपारी 3 पर्यंत टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पहिल्या तीन दिवसांत छोटे ब्लॉक घेऊन काम केले जातील. त्यावेळीही काही प्रमाणात लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्यावेळी बेलापूर स्थानकातील फलाट क्रमांक 1 आणि 3 वरूनच लोकल गाड्यांची वर्दळ सुरु राहणार आहे. तर फलाट दोन बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी मध्य रेल्वेकडून 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. यावेळी सीएसएमटीपासून ते नेरुळपर्यंतच सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.