Thu, Jan 24, 2019 03:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किरीट सोमय्यांच्या सेल्फीने संताप

किरीट सोमय्यांच्या सेल्फीने संताप

Published On: Jan 13 2018 1:26PM | Last Updated: Jan 13 2018 1:27PM

बुकमार्क करा
मुंबई  : पुढारी ऑनलाईन 

मुलुंडमधील नाणेपाडा भागात दोन बिबट्यांनी धुमाकूळ घातला. ६ तासांच्या अथक प्रयत्‍नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. त्यापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्‍ल्यात ७ जण जखमी झाले आहेत. या सर्व प्रकार सुरु असतानाचा किरीट सोमय्या यांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही. यावरुन त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.

दोन बिबट्यांनी मुलुंडमधील नाणेपाडा भागातील नागरिकांवर हल्ला करत असताना किरीट सोमय्यांनी त्यांनी आपल्या ट्विटर हँडेलवरुन  त्यातील एका जखमी व्यक्तीबरोबर सेल्फी काढला आणि ट्विटरवर शेअर केला. या त्यांच्या कृत्यावर टीका होत आहे. सोमय्यांनी त्या जखमी व्यक्तीवर उपचार करण्याऐवजी सेल्फी काढण्यात धन्यता मानली. किरीट सोमय्यांना प्रसिध्दीच्या मोह आवरता आला नाही असेच म्हणावे लागेल.