Wed, Apr 24, 2019 01:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुकेश अंबानींच्या कन्येची सुपारी फुटली!

मुकेश अंबानींच्या कन्येची सुपारी फुटली!

Published On: May 06 2018 7:28PM | Last Updated: May 06 2018 7:27PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाचं लग्न ठरलं आहे. पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत ईशाचं लग्‍न होणार आहे. याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात ईशा आणि आनंद यांचा विवाहसोहळा होणार असल्‍याची चर्चा आहे. 

ईशाचे होणारे पती आनंद पिरामल हे प्रसिद्ध रिअल इस्टेट पिरामल रिअल्टीचे कार्यकारी संचालक आहेत. त्‍यांनी पिरामल स्वास्थ्य’ची स्‍थापना केली असून, ‘पिरामल स्वास्थ्य’कडून एकाच दिवसात तब्बल ४० हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केला जात आहे. आनंद पिरामल इंडियन मर्चंट चेंबरच्या युवा विंगचे सर्वात कमी वयाचे अध्यक्षही होते.

आनंदने महाबळेश्‍वरमध्ये एका मंदिरात ईशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. यानंतर या दोघांनी आपले आई-वडील आणि कुटुंबातील इतर व्यक्तींबरोबर जेवण करत असताना त्‍यांना याबद्दल सांगितले. यावेळी नीता अंबानी, मुकेश अंबानी, स्‍वाती आणि अजय पिरामल, कोकिलाबेन अंबानी आणि पूर्णिमाबेन दलाल, आकाश आणि अनंत अंबानी, आनंदची बहिण नंदिनी हे उपस्थित होते.

आनंद पिरामल हे अजय पीरामल आणि स्वाती पीरामल यांचे पुत्र असून, त्‍यांनी पेंसिल्वेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केले आहे. तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली आहे.