Mon, Jan 21, 2019 03:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर होणार 'लिपिक ' 

एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर होणार 'लिपिक ' 

Published On: Dec 06 2018 9:14PM | Last Updated: Dec 06 2018 9:14PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

एसटी बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टरांसाठी खुशखबर आहे. एसटी महामंडळातील चालक आणि वाहकांना लिपिक पदावर बढती देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. त्यामुळे महामंडळातील पदवीधर आणि पदव्युत्तर कर्मचाऱ्यांना लिपिक आणि टंकलेखक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी पदावरील कर्मचाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यानुसार, चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षा रक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. 

या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक – टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री रावते यांनी आज केली. एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या निर्णयाची अनोखी भेट देऊन मंत्री श्री. रावते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केले.