Tue, Sep 17, 2019 22:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुप्रिया सुळे लोकसभेत 'राष्ट्रवादी'च्या गटनेतेपदी तर तटकरेंकडे उपगटनेतेपद

सुप्रिया सुळे लोकसभेत 'राष्ट्रवादी'च्या गटनेतेपदी तर तटकरेंकडे उपगटनेतेपद

Published On: Jul 11 2019 6:21PM | Last Updated: Jul 11 2019 6:21PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेतील आपल्या नेत्यांची घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली असून खासदार सुनील तटकरेंकडे उपगटनेतेपद सोपवण्यात आले आहे. तर पक्षाने चिफ व्हिप म्हणून लक्षद्वीपचे एकमेव खासदार मोहम्मद पी.पी. फैजल यांची निवड केली. 

या निवडीबाबत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. सुनील तटकरे यांनी ट्वीट करून या निवडीची माहिती देताना म्हटले आहे की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझी लोकसभेत उपगटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आदरणीय खा. शरद पवार साहेबांचे मनःपूर्वक आभार! या संधीचा मी आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व लोकांच्या हितासाठी पूर्ण उपयोग करेन." 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex