Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'त्या' मोटरमनला पाच लाखांचे बक्षीस 

'त्या' मोटरमनला पाच लाखांचे बक्षीस 

Published On: Jul 03 2018 10:20PM | Last Updated: Jul 03 2018 10:59PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळत असताना वेळीच इमर्जन्सी ब्रेक मारून मोठा अनर्थ टाळलेल्या मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पाच लाखाचे पारितोषिक जाहीर केले. सावंत यानी दाखवलेल्या प्रसंगावधनाचे देशभरातून कौतुक होत आहे. रेल्वेमंत्र्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी जखमींना प्रत्येकी एक लाखांची मदत जाहीर केली.

त्याचबरोबर उपचाराचा सर्व खर्च रेल्वेकडून केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नसली, तरी पाच पादचारी जखमी झाले आहेत. मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी यावेळी प्रत्यक्ष आलेला अनुभव सांगितला. ते म्हणाले, की ज्यावेळी पादचारी पुल कोसळत होता तेव्हा मी इर्मजन्सी ब्रेक दाबला. त्यामुळे होणारा अनर्थ टळला. त्यावेळी बरीच गर्दी होती.