Fri, Apr 26, 2019 04:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › IPL वेड्या तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्या

IPL वेड्या तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्या

Published On: Apr 11 2018 9:32AM | Last Updated: Apr 11 2018 9:32AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सध्याच्या घडीला तरुणाई आयपीएलच्या रंगात रंगली आहे. परंतु, मुंबईतील एका तरुणाने आयपीएल वेडापायी गळफास घेऊन आत्‍महत्या केल्याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. कामधंदे सोडून सारखे आयपीएल बघतोस म्‍हणून आई ओरडली. यावरून नीलेश गुप्‍ता नावाच्या या १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्‍महत्या केली. अशा शुल्‍लक कारणावरून विद्यार्थी आत्‍महत्या करण्याचा प्रकार चिंताजनक आहे.

सोमवारी जोगेश्वरी परिसरात राहणारा नीलेश आयपीएल बघत होता. तेव्‍हा आईने त्याला पाण्याची टाकी भरलीय का? ते बघायला सांगितलं. पण आयपीएलचा सामन्यात गुंग झालेल्या नीलेशने ते ऐकलं नाही. यावरून आई नीलेशवर ओरडली. मग, दोघांमध्ये वाद झाला. आई टीव्‍ही बंद करून पाण्याची टाकी बघायला बाहेर गेली. तेव्‍हा घरात नीलेशची लहान बहीण आणि वडील घरात नव्‍हते. १५ मिनिटांनी आई परत आली तर घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता.

आतून काहीही प्रत्युत्तर न आल्याने आईने शेजार्‍यांच्या मदतीने दरवाजा तोडला. तर आत नीलेशने गळफास घेतला होता. तातडीने त्याला रुग्‍णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

नीलेश बी.कॉम.चा विद्यार्थी होता. त्याला क्रिकेट खूप आवडत होते. रागाच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलले, असे त्याचे वडील अनिल गुप्‍ता यांनी सांगितले.

Tags : mumbai, mumbai news, ipl, ipl 2018, suicide