Sun, Sep 22, 2019 21:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र दिनी ८०० पोलिसांना बहाल होणार पोलिस महासंचालक पदक

महाराष्ट्र दिनी ८०० पोलिसांना बहाल होणार पोलिस महासंचालक पदक

Published On: Apr 24 2019 12:08PM | Last Updated: Apr 24 2019 12:08PM
नवी मुंबई : प्रतिनिधी

येत्या १ मे ला राज्य पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी आणि सलग १५ वर्षे उल्लेखनीय सेवा करणार्‍या तब्बल ८०० पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार आहे.

यामध्ये नक्षलवादी भागात  सलग तीन वर्षे सेवा, गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस ठाणे, गंभीर गुन्ह्यांची उकल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लाचखोराविरोधात कारवाई करून न्यायालयात आरोपींना शिक्षा होणे अशी उल्लेखनीय कामगिरी करणा-या आणि १५ वर्षे सलग सेवेत कुठलाही गंभीर गुन्हा, शिक्षा, दंड, विभागीय चौकशी,  नोटीस नाही, अशाच पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांची या पदकासाठी निवड केली जाते. निवडक कर्मचारी व अधिकारी यांची यादी पोलिस महासंचालकांना पोलिस आयुक्त व एसपी आणि विभागीय आयुक्त यांच्यामार्फत पाठवली जाते. त्यानंतर महासंचालक कार्यालयातील समितीकडून पडताळणी करून अहवाल सादर केला जातो. त्यावर पोलिस महासंचालक यांनी होकार दिल्यानंतर संबंधित कर्मचारी व अधिकारी यांची निवड केली जाते. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, कोल्हापूर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथक, लाचलुचपत विभाग, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपुर येथील पोलीसांचा या यादीत समावेश आहे. ठाणे एसीबीचे डीवायएसपी कन्हैया थोरात, पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे ( नवी मुंबई), पीआय अश्विनी बिद्रे प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी एसीपी संगीता अल्फोन्सो यांना हे पदक बहाल केले जाणार आहे.