Thu, Aug 22, 2019 14:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तब्बल ७० हजार कोटी अक्षरशः पडून; घ्यायला मालक नाही!

तब्बल ७० हजार कोटी अक्षरशः पडून; घ्यायला मालक नाही!

Published On: Apr 26 2019 4:53PM | Last Updated: Apr 26 2019 6:34PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आपल्या देशामध्ये जेव्हा एखाद्या नवीन योजनेची सुरवात होते, किंवा बंपर सूट दिली जाते तेव्हा त्या योजनेवर तुटून पडतात असा इतिहास आहे. अशावेळी ग्राहक भविष्याचा विचार करून कधी शेअर खरेदी करतात, किंवा पोस्ट ऑफिस योजना  किंवा विमा खरेदी करून रिकामे होतात. कालातरांने काही तांत्रिक अडचणींमुळे याच योजना सलग ठेवता येत नाहीत त्यामुळे एकवेळा पैसे भरून दुसऱ्यावेळी विसरून जातात. 

अशा विसरलेल्या पैशाचा एकत्रित विचार केल्यास देशात तब्बल ७० हजार कोटी रुपये पडून आहेत. या भल्यामोठ्या रकमेसाठी कोणीही वाली नाही अशी अवस्था आहे. योजनेमध्ये पैसा गुंतवला खरा, पण मॅच्युरिटीपर्यंत वाट पाहिली नाही अशी पण प्रकरणे आहेत. आकस्मिक मृत्यूमुळेही बऱ्याच जणांचे गुंतवलेले पैसे पडून आहेत. त्याची सुगावाही कुटुंबियांना नाही, अशी परिस्थिती आहे. 

एका कंपनीमध्ये १५०० कोटी 

पिअरलेस जनरल फायनान्स ॲन्ड इन्वेस्टमेंटमध्ये भारतीयांचे १५०० कोटी आहेत. गेल्या १५ वर्षांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम वाढून १ हजार ५१४ कोटी झाली आहे. १५ वर्षांपूर्वी छोट्या गुंतवणुकदारांना डिपॉझिट सर्टीफिकेट वाटून १.४९ कोटी जमवले होते. त्यावेळी ५१ डिपॉझिट सर्टीफिकेट २ हजारपेक्षा कमी भावामध्ये जारी केले होते. आता ही सर्व रक्कम इन्वेस्टर एज्युकेशन ॲन्ड प्रोटेक्शन फंडात (आयईपीएफ) वळवण्यात आली आहे. 

आयईपीएफमध्ये गेल्या सात वर्षामध्ये बेवारस असलेल्या कंपनींचे लाभांश आणि शेअर ट्रान्सफर करण्यात आले आहेत.  अशी ट्रान्सफर करण्यात आलेली रक्कम ४ हजार  १३८ कोटींच्या घरात गेली आहे. त्याच बरोबर कंपन्यांचे २१ हजार २३२.१५ कोटी मुल्याचे ६५.०२ शेअर जमा आहेत. 

अर्थभान - http://www.pudhari.news/arthabhan.php

विम्याचे १६ हजार कोटी

देशातील २४ विमा कंपन्यांमध्ये विमाधारकांचे १६ हजार रुपये पडून आहेत. यामधील ७० टक्के रक्कम म्हणजेच एकुण १० हजार ५०९ कोटी एलआयसी विमाधारकांचे आहेत. तर इतर  कंपन्यांकडे ८४८ कोटी पडून आहेत ज्याला कोणीच वाली नाही. 

बँकांमध्ये २० हजार कोटी 

रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाचा डिपॉजिटर एज्युकेशन ॲन्ड अव्हेरनेस फंड विभाग गेल्या १० वर्षांत ज्यांनी आपल्या पैशावर दावा केलेला नाही अशा पैशांवर कब्जा करतो. जून २०१८ पर्यंत १९ हजार ५६७ कोटी अशा पद्धतीने जमा झाले आहेत.

पोस्ट ऑफिसमध्ये ९ हजार कोटी

पोस्ट ऑफिसमध्ये ९ हजार कोटी पडून आहेत. विविध कारणास्तव कोणीही गुंतवलेल्या रकमेवर दावा न केल्याने इतकी रक्कम बेवारस पडून आहे.