Thu, Mar 21, 2019 11:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तरुणाईच्या उत्साहाने ‘मूड इंडिगो’त चैतन्य

तरुणाईच्या उत्साहाने ‘मूड इंडिगो’त चैतन्य

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:20AM

बुकमार्क करा

मुंबई :  प्रतिनिधी 

आयआयटी मुंबईच्या मुड इंडिगो या चार दिवसीय उत्सवामध्ये देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सळसळत्या उत्साहाने चैतन्य निर्माण केले. नृत्य, नाटक, फॅशन, लाईव्ह कॉन्सर्ट अशा विविध अदाकारीमध्ये सहभाग घेऊन अंगभूत कलांना प्रदर्शित केले.

देशातील विविध राज्यांमधून आलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतीचे दर्शन करणारे पारंपरिक नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. अमरावती येथून आलेल्या सिप्ना इंजिनीअरींग महाविद्यालाच्या शुभम फंदे, मनिष कठाणे आदी विद्यार्थ्यांनी अंबादेवी व एकवीरा देवीची पूजा-आरती सादर केली तर सांगलीच्या वालचंद इंजिनीअरींग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देवीचा गोंधळ सादर केला. त्याशिवाय पंजाब, हरयाणा, दिल्ली येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केले. मुंबईतील एनएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कालबेलिया हे राजस्थानी नृत्य सादर केले. मिठीबाई महाविद्यालयाने देखील यामध्ये सहभाग घेतला होता. श्रीलंकेच्या रणरंगा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील नृत्य सादर करुन टाळ्या मिळवल्या. 

आयआयटीमधील अंतर्गत रस्त्यांवर विद्यार्थ्यांचे अनेक गट मुड इंडिगो मधील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते. मोकळ्या रस्त्यांवर समूहाने स्केटिंग करत काही विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवून दिले. रॉक बॅन्डच्या कार्यक्रमाला सर्वात जास्त गर्दी झाली होती. हिंदी रॉक बॅन्ड, समूह गायन, वैयक्तिक क्‍लासिकल गायन, हिंदी गायन, इन्स्ट्रुमेंटल वादन अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन महोत्सवाचा पूरेपुर आनंद घेतला.