Mon, Sep 24, 2018 19:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पावसाळी अधिवेशन; नागपूरवर शिक्कामोर्तब

पावसाळी अधिवेशन; नागपूरवर शिक्कामोर्तब

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 1:43AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

येत्या 4 जुलैपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. मात्र, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा केली जाणार आहे. 

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्याबाबत गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी त्यांनी मंत्री समिती नेमली आहे.

त्यामध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या त्यामध्ये समावेश आहे. या समितीची मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली असता अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. नागपूर कराराप्रमाणे उपराजधानीत अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्‍नावर चर्चा अपेक्षीत आहेत. मात्र, डिसेंबरमध्ये होणार्‍या या अधिवेशनात आथिंक वर्ष तोंडावर असल्याने पुरवणी मागण्यांमधूनही विदर्भाला न्याय मिळत नाही. त्यामुळे हे अधिवेशन जुलैमध्ये घेतल्यास अधिक फायदा होईल अशी सरकारची भूमिका आहे. 

Tags : Mumbai, monsoon session, Nagpur, Mumbai news,