Tue, Nov 13, 2018 08:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मस्‍ती माकडाची....हैराण रामनाथजी (video)

मस्‍ती माकडाची....हैराण रामनाथजी (video)

Published On: Apr 07 2018 6:09PM | Last Updated: Apr 07 2018 6:09PMविरार: प्रथमेश तावडे

विरारमध्ये फुलपाडा परिसरात काल संध्याकाळी एका माकडांनी चांगलीच करमणूक केली. एका वाटसरूला हेरून त्याला पूर्णत: हैराण केले. काही केल्या ते माकड या वाटसरूला सोडत नव्हते. विरार गांधीचौक परिसरात राहणारे राजनाथ कश्यप हे संध्याकाळी आपले दुकान बंद करून ताराण लावाकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते.

यावेळी एका माकडाने त्यांना हेरले. आणि पुढील अर्धातास त्यांना सोडले नाही. माकडांनी या राजनाथ कश्यप यांना कोणतेही नुकसान पोहचवले नाही. पण तब्बल अर्धा तास या माकडाने त्या राजनाथ कश्यप यांचा पाठ सोडली नाही.  या माकडापासून सुटका करण्याची त्यांची धडपड कॅमेऱ्यात बघ्यांनी कैद केली. या माकडामुळे बघ्यांची गर्दी जमली. लोकांची मोठी करमणूक या माकडांनी केली. येथील बघ्याने त्याचा व्‍हिडिओ करून सोशल मीडियावर व्‍हायरल करण्यात आला.

Tag: monkey, harass, video in virar,