Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेसबुकवर अश्‍लील मॅसेज पाठवून लेखिकेचा विनयभंग

फेसबुकवर अश्‍लील मॅसेज पाठवून लेखिकेचा विनयभंग

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:38AMमुंबई ः प्रतिनिधी

फेसबुकवर अश्‍लील मॅसज पाठवून एका लेखिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी बेळगाव येथून हदीमनी टी एफ ऊर्फ हादीमनी तमन्ना फकीरप्पा नावाच्या एका 49 वर्षीय आरोपीस शनिवारी जुहू पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तक्रारदार या लेखिका असून त्यांनी आता सामाजिक तसेच विविध विषयांवर लेखन केले आहे.

त्यांचे फेसबुकवर एक अकाऊंट असून या अकाऊंटवर त्यांना अनेक प्रतिक्रिया येतात. नियमित फेसबुक पाहताना त्यांना दोन वर्षांपूर्वी काही व्यक्तींचे मॅसेज वाचण्यात आले. मोहम्मद अन्सारी, हादीमनी टी एफ, सबीर गुडेकर आणि मोहित बोबडे या व्यक्तींनी त्यांच्या फेसबुकवर काही अश्‍लील मॅसेज पाठविले होते. या मॅसेजनंतर त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

त्यांच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत या व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असतानाच यातील हदीमनी नावाचा एक आरोपी कर्नाटकच्या बेळगाव, कटकोळ परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर जुूहू पोलिसांनी तिथे जाऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ते मॅसेज पाठविल्याची कबुली दिली आहे.