Tue, Nov 20, 2018 01:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Published On: Jan 26 2018 4:27PM | Last Updated: Jan 26 2018 4:27PMडोंबिवली : पुढारी ऑनलाईन

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या आईच्या मित्राने विनयभंग केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. पीडित मुलगी डोंबिवली पूर्व परिसरात राहते. 

८ जानेवारी रोजी पीडित मुलीच्या आईचा मित्र सुधीर कोतकर याने तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घडला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने आईचा मित्र सुधीर कोतकर याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.