Sat, Aug 24, 2019 23:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विनयभंगाच्या गुन्ह्यांत निर्मात्याला अटक

विनयभंगाच्या गुन्ह्यांत निर्मात्याला अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

विनयभंगाच्या गुन्ह्यांत अधुरी ख्वाईश या चित्रपटाचा निर्माता अनिश छोटेलाल रॉय याला शनिवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अनिश व त्याची आई सोनम आर. जे हिने चित्रपट करण्यापूर्वी केलेल्या कराराचे उल्लघंन करुन अभिनेत्रीचे अश्‍लील आणि आक्षेपार्ह दृष्य चित्रीत करुन ब्लूफिल्म बनविल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत सोनम ही पाहिजे आरोपी आहे. 

भाईंदर येथे राहणार्‍या तरुणीने काही हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. तिला अनिश रॉय एक चित्रपट बनवित असून त्यासाठी त्याला मुख्य रोलसाठी अभिनेत्रीची गरज असल्याचे समजलेे. त्यानंतर ही तरुणी आलम खान या मित्रासोबत त्याच्या अंधेरीतील लोटस पेट्रोल पंपाजवळील आदर्शनगर, ए आर क्रिएशनच्या कार्यालयात गेली होती. यावेळी अनिशने तिला त्याच्या अधुरी ख्वाईश या चित्रपटात साईन केले, तसेच तिच्याकडून चित्रपट निर्मितीसाठी आठ लाख रुपये घेतले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिला पैसे परत करण्याचे आश्‍वासन दिले. 

Tags : mumbai news, molestation, case, Producer, arrested,


  •