Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिल्डरकडून तरुणीचा विनयभंग

बिल्डरकडून तरुणीचा विनयभंग

Published On: Aug 06 2018 1:41AM | Last Updated: Aug 06 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी

नव्याने बांधण्यात येणार्‍या इमारतीमध्ये वनबीएचके फ्लॅट देण्याचे आमीष दाखवत एका बांधकाम व्यावसायिकाने 49 वर्षीय महिलेला तब्बल 70 लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगावमध्ये उघडकीस आला आहे. हा बांधकाम व्यावसायीक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पैसे परत मागण्यासाठी आलेल्या या महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केला, तसेच तिला व तिच्या कुटुबाला ठार मारण्याची धमकीही दिली. अखेर या पिडीत महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन गोरेगाव पोलीस तपास करत आहेत.

पोलिसाकंडू मिळालेल्या माहितीनुसार, शहा यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या या महिलेशी त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर आपल्या आणि आपल्या कुटुंबालाही ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलेने गोरेगाव पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीत केला आहे. या महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी शहा विरोधात फसवणूक, विनयभंग आणि धमकावल्याच्या भादंवी कलमांसह मोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.