Sun, Feb 17, 2019 21:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोहन भागवत यांनी माफी मागावी : अशोक चव्हाण

मोहन भागवत यांनी माफी मागावी : अशोक चव्हाण

Published On: Feb 12 2018 12:42PM | Last Updated: Feb 12 2018 12:41PMमुंबई : प्रतिनिधी

लष्कराला सैनिक तयार करण्यासाठी सहा-सात महिने लागतात. मात्र देशाला गरज पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीन दिवसात सैन्य उभे करेल असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लष्कराचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल भागवत यांनी तात्काळ भारतीय सैन्य दलाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.