Wed, Jan 16, 2019 13:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये खिशातील मोबाईलच्या स्फोटाने खळबळ (video)

भांडुपमध्ये खिशातील मोबाईलच्या स्फोटाने खळबळ (video)

Published On: Jun 05 2018 9:00PM | Last Updated: Jun 05 2018 8:59PMभांडूप : वार्ताहर

भांडूप स्थानकाजवळच्या स्टेशन प्लाझामध्ये हॉटेल बगीचा व्हेज रेस्टॉरंटमध्ये सोमवारी दुपारी खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन एक व्यक्‍ती जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

हॉटेलमध्ये ही व्यक्‍ती आपल्या दोन सहकार्‍यांसह दुपारी दीड वाजता जेवणासाठी आली होती. गप्पा मारत असताना अचानक शर्टच्या खिशात ठेवलेल्या दोन मोबाईलपैकी एकातून धूर येऊ लागला.

 काही क्षणातच मोबाईलने पेट घेतला. मोबाईल जमिनीवर फेकताच त्याचा स्फोट झाला. छातीला, बोटाला दुखापत झाल्याने हॉटेलच्या व्यवस्थापकांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून रुग्णालयात पाठवले. या व्यक्‍तीने याबाबत कोठेही तक्रार केली नसल्याने त्याचे नाव, मोबाईलच्या कंपनीची माहिती मिळाली नाही. एकीकडे मोबाईल, फोनमुळे माणसाला मोठा फायदा जरी होत असला तरीही  हे मोबाईल अनेकदा आपल्या  जीवावर बेतताना दिसतात,  हे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.