होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुत्ते भौंकते है...: पठाण यांना मनसेचे प्रत्युत्तर

कुत्ते भौंकते है...: पठाण यांना मनसेचे प्रत्युत्तर

Published On: Dec 04 2017 10:54AM | Last Updated: Dec 04 2017 11:40AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज ठाकरे म्‍हणजे बुझा हुआ दिया, अशी बोचरी टीका करून हिंमत असेल तर भायखळ्यात येऊन तोडफोड करून दाखवा, असे खुले आव्‍हान मनसेला एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी दिले होते. त्यावर मनसेनेही आपल्या स्‍टाईलने प्रत्युत्तर दिले आहे. कुत्ते भौंकते हे, हाथी चलता है, अशा शब्दांत मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. 

मनसे नेते यशवंत किल्‍लेदार यांनी वारिस पठाण यांच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला. "वारिस मूर्ख माणूस आहे. त्याला प्रसिद्धी देण्याची गरज नाही. असे भूंकणारे कुत्रे बरेच असतात. मात्र, हत्ती त्याच्या डौलातच पुढे जात असतो. तरीही माझ्याकडून ईदच्या शुभेच्‍छा आहेत," असे टीकास्‍त्र त्यांनी सोडले. 

राज यांच्या सभांना, मोर्चांना लाखोंची गर्दी होते. ती म्‍हणजे बुझा हुआ दिया आहे काय? दीड वर्षांनंतर निवडणूक आहे. कोण बुझतंय ते तेव्‍हा कळेल, असे किल्‍लेदार म्‍हणाले. 

मुंबईत फेरीवाल्यांवरून सुरू असणार्‍या मनसे-काँग्रेस वादात एमआयएमने उडी घेतली आहे. तसेच राज ठाकरेंवर टीका करताना हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्‍हाला दाखवतो, असे आव्‍हान आमदार पठाण यांनी राज ठाकरेंना दिले होते. तसेच मनसेची तोडफोड हे अस्‍तित्‍व टिकवण्यासाठीचा खटाटोप असल्याचे म्‍हटले होते. 

संबंधित बातमी: 

राज ठाकरे बुझा हुआ दिया : वारिस पठाण