होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका; 'उद्धवा अजब तुझे सरकार'

मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका; 'उद्धवा अजब तुझे सरकार'

Last Updated: Jan 22 2020 11:25AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

तब्बल 88 वर्षांनी पुन्हा मुंबई पोलिस दलात अश्वदलाचा (माऊंटेड पोलीस युनिट) समावेश करण्यात येत आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणार्‍या ध्वजारोहनाच्या मुख्य शासकीय समारंभातील संचलनात हे पथक सहभागी होणार आहे. यापार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

महाविकास आघाडीच्या सरकारने मुंबई पोलिसांचे अश्वदल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेले. आमचे पोलिस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आले...असा खोचक टोमणा मारत 'उद्धवा अजब तुझे सरकार', असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन २३ रोजी होणार आहे. या अधिवेशनात मनसे नवा झेंड्यासह मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. तसेच  राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता संदीप देशपांडे यांच्या ट्विटवरून वर्तवण्यात येत  आहे.