Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिंदीवाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही : मनसे

हिंदीवाल्यांची दादागिरी खपवून घेणार नाही : मनसे

Published On: Dec 20 2017 4:33PM | Last Updated: Dec 20 2017 4:33PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

येत्या शुक्रवारी काही हिंदी आणि मराठी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. हिंदी चित्रपटांसाठी थिएटर बुक असल्याने मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. पण, यावर 'हिंदी चित्रपटांच्या निर्मात्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला. तसेच, महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ‘देवा’ चित्रपटाची टीम उपस्थित होती. पुढे बोलताना ते म्हणाले, स्क्रीन मिळत नाही म्हणून ‘देवा’ची टीम माझ्याकडे आली. आपण हा मुद्दा सोवडूच पण जर ‘गच्ची’ या चित्रपटाला सुद्धा स्क्रीन मिळत नसेल तर, त्यांनाही आम्ही मदत करू. महाराष्ट्रात मराठी चित्रपटासाठी आंदोलन करावी लागतात, हेच दुदैवी असल्याचे खोपकर म्हणाले. 

तसेच, कालपासून बातम्या व्हायरल होत आहेत की, आमचा टायगर जिंदा है चित्रपटाला विरोध आहे, आमचा हिंदी चित्रपटांना विरोध नाही, पण, त्यांच्या मुजोरीला आणि दादागिरीला विरोध आहे. यशराज फिल्मने कोणाशीही स्क्रिन शेअर करणार नाही असे सांगितले आहे. असे असताना आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही खोपकर यांनी दिला.