Fri, Mar 22, 2019 22:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘हा कसला ‘मर्द’पणा’, राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे टार्गेट 

‘हा कसला ‘मर्द’पणा’, राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे टार्गेट 

Published On: Mar 08 2018 9:24PM | Last Updated: Mar 08 2018 9:24PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्राबाबू नायडू एनडीएतून बाहेर पडण्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र रेखाटलं आहे. आपल्या फेसबुक पेजवरुन राज ठाकरें यांनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.

‘स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान!’ या मथळ्याखाली रेखाटलेल्‍या व्यंगचित्रात, उद्धव ठाकरे, चंद्राबाबू नायडू आणि आणखी एकजण दाखवण्यात आले आहे. तर खिडकीतून मोदी पाहत असल्याचे दिसत आहेत.

उद्धव ठाकरे चंद्राबाबूंकडे पाहत म्हणतात, “हॅss.. यात कसला आलाय ‘मर्द’पणा? त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून, अपमान गिळून वर सरकारला धमक्या देऊन दाखवा!”

चंद्राबाबू यांनी मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळून केंद्र सरकार आणि एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय निर्णय घेतला. चंद्राबाबू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्‍थानी आपले राजीनामे सुपुर्द केले. 

चंद्राबाबू सत्तेतून बाहेर पडल्याने राजकीय गोटात शिवसेनेची चर्चा सुरु झाली. शिवसेनेने याआधी खूप वेळा सत्‍तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्याच अनुशंघाने राज ठाकरेंने यावेळी व्यंगचित्र रेखाटले आहे.