Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंना समजली शहा-उद्धव यांची ‘मन की बात’

राज ठाकरेंना समजली शहा-उद्धव यांची ‘मन की बात’

Published On: Jun 08 2018 6:27PM | Last Updated: Jun 08 2018 6:30PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या जुन्या मित्राला मनवण्यासाठी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. बुधवारी झालेल्या भेटीनंतर पुन्‍हा युतीच्या चर्चाही सुरू झाल्या परंतु त्यातून काहीही साध्य झाले नसून आपण स्‍वतंत्रच लढणार असल्याचे घुमजाव शिवसेनेने केले. असे असले तरी शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दरवाज्या आड दोन तास काय चर्चा रंगली होती? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. याचसंदर्भातील एक व्यंगचित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. 

शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना शिवसेनेने घुमजाव केले. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या भेटीवर मनसेप्रमुखांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक अकाऊंटवरुन हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.

या व्यंगचित्रात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गळाभेट घेत आहेत. या दोघांचाही एक-एक हात एकमेकांच्या पाठीवर ठेवला आहे. तर दोघांच्या दुसऱ्या हातात खंजीर आहे. हा खंजीर ते एकमेकांच्या पाठीत खुपसण्याच्या तयारीत असल्याचे राज यांनी दाखवले आहे. या चित्रातही उद्धव ठाकरे यांच्या खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याचे दिसत आहे.
No automatic alt text available.