Sat, Feb 16, 2019 11:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिर्जा गालीब यांच्या जयंतीनिमित्‍त गुगलचे डूडल

मिर्जा गालीब यांच्या जयंतीनिमित्‍त गुगलचे डूडल

Published On: Dec 27 2017 9:11AM | Last Updated: Dec 27 2017 7:47PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रसिद्ध उर्दू शायर मिर्जा गालीब यांच्या जयंतीनिमित्‍त गुगलने त्‍यांचे खास डूडल बनवले आहे. गालीब यांची आज २२० वी जयंती आहे. संपूर्ण जगभरात गालीब यांच्या शायरीचे चाहते आहेत. २७ डिसेंबर १७९७ मध्ये आगरा येथे गालीब यांचा जन्म झाला होता. गालीब यांनी फारशी, उर्दू आणि अरबी भाषेत शिक्षण घेतले होते. 

गुगलने बनवलेले डूडलमध्ये गालीब यांच्या एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात कागद घेतलेला आहे. ते उभा राहिलेले दिसत आहेत. गालीब यांचा कार्यकाळ हा मुघलकालीन होता. त्‍यावेळी मुघलांकडून समाजावर होणारा अन्याय गालीब यांनी आपल्‍या शायरीतून जगासमोर आणला होता. त्‍यामुळे त्‍यांच्या शायऱ्यांमध्ये उदीसी दिसते. गालीब लहाण असतानाच त्‍यांचे पालकत्‍व हरपल्‍याने त्‍यांच्या जीवनात उदासीनता आली होती. त्‍यांनी आपले हे दु:ख शायरीतून व्यक्‍त केले आहे.  


गालीब यांच्या निवडक शायरी

मैं नादान था जो वफा को तलाश करता रहा गालिब
यह न सोचा के एक दिन अपनी साँस भी बेवफा हो जाएगी 
 

उनके देखे से जो आती है मुंह पे रौनक

वो समझते हैं बीमार का हाल अच्छा है,

हमको मालूम है जन्नत  की हकीकत लेकिन

दिल के बहलाने को गालिब ख्याल अच्छा है

न सुनो गर बुरा कहे कोई,

न कहो गर बुरा करे कोई।।