Mon, Apr 22, 2019 12:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गर्भपातासाठी अल्पवयीन मुलीची हायकोर्टात धाव

गर्भपातासाठी अल्पवयीन मुलीची हायकोर्टात धाव

Published On: Jul 13 2018 1:24AM | Last Updated: Jul 13 2018 1:10AMमुंबई : प्रतिनिधी 

बलात्कार पीडित सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने  21 आठवड्याचा गर्भपात करण्यास परवानगी द्या, अशी विनंती करत उच्च न्यायालयाचे दरवाजा  ठोठावले आहेत. न्यायमूर्तीं नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने या याचिकेची गंभीर दखल घेऊन के ई एम रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाला बलात्कार पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून तातडीने 13 जुलै रोजी अहवाल देण्याचे आदेश दिले.

गोवंडी येथील या सोळा वर्षाच्या मुलीची वैेद्यकीय तपासणी केल्यानंतर ती  पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. पाणी देण्यासाठी गेलेल्या या मुलीवर  व्यवसायाने वकील असलेल्या व्यक्तीने पाच महिन्यांपूर्वी जबरदस्तीने  बलात्कार  केला. त्या संबंधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

21आठवड्याची  गर्भवती असलेल्या या पिडीत मुलीने सोनोग्राफी  अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमारे गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी केईएमच्या डॉक्टर सामंत यांनी या मुलीची वैद्यकीय तपासणीकरीता डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती दिली.  न्यायालयाने राजावाडी रुग्णालयात दाखल असलेल्या या पीडित मुलीची केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने  तपासणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल कोर्टासमोर शुक्रवारी सादर करावा असे आदेश न्यायमूर्तींनी  दिले. अहवाल सादर झाल्यानंतर खंडपीठ गर्भपाताची परवानगी द्यायची की नाही त्या बाबत शुक्रवारी निर्णय घेणार आहे.