Tue, Jul 23, 2019 04:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गर्भपाताच्या प्रयत्नात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

गर्भपाताच्या प्रयत्नात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Published On: Feb 13 2018 7:35AM | Last Updated: Feb 13 2018 7:35AMतळोजा : वार्ताहर

प्रेम संबंधात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने डॉक्टरांचा सल्ला न घेता जादा गोळ्यांचा डोस दिल्याने अतीरक्तस्त्राव होवून मुलीसह तीच्या पोटातील सात महिन्याचा अर्भकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना कळंबोलीत घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अक्षय दहिफळे या तरुणावर गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तो एफवाय बीएसस्सीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. या प्रकरणातील मृत अल्पवयीन मुलगी आणि अक्षय हे दोघेही कळंबोळीत राहतात. के.एल. टू मध्ये राहणारा अक्षय हा एफवाय बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. तर मृत मुलगी सुद्धा शिक्षण घेत होती. त्यामुळे रविवारी दुपारी पिडीत मुलीला अतिरक्तस्राव झाला. या घटनेनंतर पिडीत मुलीच्या पालकांनी तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिला वाचविण्यात डाँक्टराना यश न आल्याने तिचा व तिच्या पोटातील अर्भकाचा रात्री उशिरा मत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी एमजीएम रुग्णालयात धाव घेऊन अधिक माहिती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कळंबोली पोलिसांनी रात्री उशीरा अक्षय दहीफळे
या तरुणावर बलात्कारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करुन फरार अक्षयचा शोध सुरु केला आहे. कळंबोलीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कोंडीराम पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी महेंद्र मोरे यानी आरोपीच्या वडीलाना सोबत घेवून त्याचे मित्र व नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे.आरोपी अक्षय दहिफळे याने पिडीत मुलीला ज्या गोळ्या खाण्यासाठी दिल्या होत्या, त्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.