Tue, Jun 25, 2019 13:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकणातील जनतेसाठी मंत्रीपद ही सोडेन : सुभाष देसाई

कोकणातील जनतेसाठी मंत्रीपद ही सोडेन : सुभाष देसाई

Published On: Mar 07 2018 1:10PM | Last Updated: Mar 07 2018 1:25PMमुंबई : प्रतिनिधी

कोकणात होऊ घातलेल्या नाणार येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पाला स्थानिक जनतेचा मोठा विरोध आहे. हा प्रकल्प केंद्राचा असल्याने या प्रकल्पसंदर्भात मुख्यमंत्रीच काय तो निर्णय घेतील. एकवेळ मंत्रीपद सोडेन, पण या प्रकल्पाविरोधात जनतेच्या पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली. 

या संदर्भात काँग्रेस सदस्य हुसनबानो खलिफे यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून नाणाक प्रकल्पाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यासंदर्भात बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी असे वक्तव्य केले. नाणार प्रकल्पावरून कोकणात मोठा वाद सुरू आहे. हा प्रकल्प कोकणात होऊ द्यायचा नाही असा स्थानिकांनी पवित्रा घेतला आहे.त्यामुळे आता मुख्यमंत्री याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

संबधित बातम्याः

‘रिफायनरी रद्द’साठी ग्रामस्थांचे गार्‍हाणे

‘नाणार’बाबत शिवसेना दुटप्पी