Wed, Nov 14, 2018 12:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्य रेल्वेवर उद्यापासून बम्बार्डिअरच्या १२ फेर्‍या

मध्य रेल्वेवर उद्यापासून बम्बार्डिअरच्या १२ फेर्‍या

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 2:24AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेतून मध्य रेल्वेच्या ताफ्यात आलेल्या बम्बार्डिअर लोकलची पहिली सेवा सोमवार, 18 डिसेंबरपासून सीएसएमटी ते कल्याणपर्यंत धावणार आहे. जादा उंचीच्या कारणांमुळे बम्बार्डिअर लोकल आधी पश्चिम रेल्वेमार्गांवरच चालविण्यात येत होत्या. आता तांत्रिक बदल केल्यानंतर एकूण 24 बम्बार्डिअर लोकल टप्याटप्प्याने मध्य रेल्वेला मिळणार आहेत. 

आतापर्यंत मध्य रेल्वेवर सिमेन्स लोकल चालवल्या जात होत्या. पण आता पश्चिम रेल्वेवर येणार्‍या नवीन लोकलच्या बदल्यात त्यांच्या ताफ्यातील बम्बार्डिअर लोकल मरेवर चालवण्यात येणार आहेत. या लोकलमध्ये पाय मोकळे करुन बसण्यासाठी जागा, हवेशीर आणि अधिक प्रकाश उपलब्ध असणार आहे. दिवसाला होणार्‍या 12 फेर्‍यांपैकी सीएसएमटी ते कल्याणपर्यंत 11 आणि एक फेरी बदलापूरपर्यंत चालविली जाणार आहे. सीएसएमटी-कल्याण मार्गावर साधारणपणे  ताशी 100 किमी आणि त्यापुढे ताशी 105 किमी वेग असेल.

मध्य रेल्वेवर एकूण 24 बम्बार्डिअर लोकल चालवण्यात येणार आहेत. त्यापैकी चार बम्बार्डिअर लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील असतील, तर 20 बम्बार्डिअर लोकल नवीन असतील. चेन्नई येथील रेल्वेच्या आयसीएफ कारखान्यातून बम्बार्डिअर लोकल मार्च, 2018पर्यंत मध्य रेल्वेकडे येतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.