Tue, Apr 23, 2019 08:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  महादेव जानकरांचा आमदारकीचा राजीनामा

 महादेव जानकरांचा आमदारकीचा राजीनामा

Published On: Jul 06 2018 5:41PM | Last Updated: Jul 06 2018 5:41PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी भाजपच्या तिकीटावर असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. भाजपच्या  तिकिटावर विधानपरिषदेत जायला जानकरांनी नकार दिलाय. भाजपचा राजीनामा न देता अर्ज भरल्यास रासपचा अर्ज बाद होऊ नये म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

राज्याचे दुग्ध विकास मंत्री आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे महादेव जानकर यांनी आपला आमदारकीचा राजीनामा देत सर्वांनाचा धक्का दिला आहे. ते पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय समजले जातात.