Fri, Jul 03, 2020 03:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल : ४.५ कोटींच्या कोरोना चाचण्या मोफत करणार

पनवेल : ४.५ कोटींच्या कोरोना चाचण्या मोफत करणार

Last Updated: May 28 2020 6:49PM
नवी मुंबई : पुढारी वृतसेवा 

आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रयत्नाने आज पनवेल महानगरपालिकेस ४.५ कोटींच्या कोरोना चाचण्या मोफत करण्याची मेट्रोपोलिस लॅबने मान्य केली. मेट्रोपोलिस या कोरोना चाचणी करणाऱ्या ICMR मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळेला नुकताच पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यास या प्रयोगशाळेने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन पनवेल शहरामध्ये पुढील ३ महिन्यात एकूण १०,००० चाचण्या सीएसआर माध्यमातून मोफत करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. यानुसार आज संबंधित प्रयोगशाळेचे प्रतिनिधी डॉ. प्रदीप महिंद्रकर व  महाजन यांच्यासोबत महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी विचारविनिमय करून नियोजनाची दिशा ठरविण्यात आली. 

वाचा :कोरोनाशी लढणाऱ्या अशोक चव्हाणांनी रुग्णालयातून शेअर केला व्हिडिओ

या चाचणीसाठी आज रोजी प्रत्येकी रुपये ४,५०० खर्च येतो. या प्रस्तावामुळे महानगरपालिकेस अंदाजे रुपये ४ कोटी ५० लाख इतक्या रकमेचा फायदा होणार आहे. महानगरपालिकेच्या निधीतून हा खर्च केला असता तर तेवढा भार मनपाच्या तिजोरीवर पडणार होता. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दमदार सुरुवातीची ही झलक आहे. पनवेल लवकरच कोरोना मुक्त करण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेस नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे.

वाचा :कलावंतांसाठी विक्रम गोखले यांचा मदतीचा हात