Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केंद्राकडून महाराष्ट्राला अधिकचा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करा

केंद्राकडून महाराष्ट्राला अधिकचा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करा

Published On: Jan 18 2018 1:57AM | Last Updated: Jan 18 2018 1:14AM

बुकमार्क करा
मुंबई :

महाराष्ट्राचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणार्‍या खासदारांनी राज्यातील प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावेत. हे करत असताना केंद्राकडून राज्यातील विकास कामे व योजनांसाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील खासदारांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. महाराष्ट्राचे केंद्र शासनाकडे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत याचा पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक घेण्यात येते. यापूर्वी तीन बैठक घेण्यात आल्या आहेत. राज्यातील खासदारांनी आतापर्यंत 561 मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी 431 मुद्यांबाबत कृती अहवाल सादर करण्यात आला आहे. जे काही प्रलंबित मुद्दे आहेत त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन ते सोडविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

राज्यातील पायाभूत सुविधांचा विकासाचे दिल्लीस्तरावर जे प्रलंबित विषय आहे. ते सोडविण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करावा. राज्यशासनाशी संबंधित  विभागाला पाठवून त्या संदर्भातील अहवला मागविण्यात येईल. खासदारांनी आपल्या मतदार संघातील केंद्राकडे प्रलंबित असणार्‍या विषयांना कशी गती देता येईल, यांसदर्भात विचार करावा. तसेच केंद्राच्या माध्यमातून राज्यात जास्तीत जास्त योजना व त्यासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीस राज्यातील मंत्री तसेच खासदार उपस्थित होते.