Wed, Jul 17, 2019 10:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी  

आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु होत असून विद्यार्थ्यांना प्रारंभी अभ्यासक्रमनिहाय ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिध्दी करून त्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया 17 जून पर्यंत चालणार आहे.

 नीटचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी सेलमार्फत वेळापत्रक जाहीर केले. या अभ्यासक्रमासाठीची पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 19 जून रोजी संध्याकाळी 5 नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. राज्यभरातील विद्यार्थ्याना त्यांची प्रमाणपत्रे पडताळणी करून घेण्यासाठी 8 केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र एनआरआय विद्यार्थ्याना आपल्या प्रमाणपत्रांचे पडताळणी मुंबई येथील केंद्रातूनच करून घ्यावे लागणार आहे.

पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी 2 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 12 जुलैपर्यंत त्यांना महाविद्यालयांत प्रवेश घेता येणार आहे.