Mon, Apr 22, 2019 16:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हवालाप्रकरणी अंगाडियाला अटक

हवालाप्रकरणी अंगाडियाला अटक

Published On: Jun 29 2018 1:36AM | Last Updated: Jun 29 2018 12:55AMमुंबई : प्रतिनिधी

भुलेश्‍वर येथील एका हवाला ऑपरेटर असलेल्या अंगाडियाला बुधवारी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. हरिश शामलाल ग्यानचंदानी असे या अंगाडियाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी  सिमकार्डसह पाच मोबाईल फोन, सुमारे 93 लाख रुपयांची रोकड आणि हिशोबाची एक डायरी जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

गेल्याच आठवड्यात रामदास रहाणे याला खंडणीच्या एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. रामदास हा दाऊदचा अत्यंत जवळचा विश्‍वासू साथीदार म्हणून ओळखला जातो. त्याने एका हॉटेल व्यावसायिकाला 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. मात्र हा व्यावसायिक खंडणी देण्यास तयार नव्हता. त्यातच त्याने खंडणीसाठी धमकी येत असल्याची पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याला पोलीस संरक्षण पुरविण्यात आले होते.